कळमेश्वर: कळमेश्वर पोलिसांची धडक कारवाई पाच विधी संघर्षग्रस्त बालकांसह चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत कळमेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या एकूण नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची अंदाजे किंमत 4 लाख 60 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासादरम्या