माओवादाविरोधातील आणखी एक प्रभावी यश!
गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना व जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य शोधून नष्ट करण्यात आले.
या कारवाईत:
• 5–6 टन वजनाचे 1 लेथ मशीन जप्त
• 150 क्लेमोर व BGL पाईप्स
• 220 नग 12 बोअर पाईप्स
• 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या
• इतर माओवादी साहित्य हस्तगत करून घटनास्थळीच नष्ट
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, बीडीडीएस व सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली.
गडचिरोलीला माओवादमुक्त करण्याच्या दिशेने सुरक्षा दलांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल कटिबद्ध आहे.
#GadchiroliPolice #CRPF #AntiNaxalOperations #PublicSafety #MaharashtraPolice MissionPeace Gadchiroli
@mramesh_ips @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @dgpmaharashtra
95 views | Gadchiroli, Maharashtra | Jun 29, 2026