तालुका विधी समिती आणि जिल्हा वकील संघ वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू पी. एस. (विसंपदा) सेमी इंग्लिश शाळा येथे आयोजित कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी वेजापूर येथील न्यायाधीश श्री. डी. एस. पिसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वकील संघ सोसायटीचे चेअरमन ॲड. सोपान पवार, ॲड. आकाश ठोळे, ॲड. डी. टी. डघळे, ॲड. कुणाल बागुल यांनी विविध कायद्यांविषयी माहिती दिली. यावेळी वकील संघाचे सचिव ॲड. सोहेल पटेल, ॲड. आर. डी. शिरसाठ उपस्थित होते.