नरखेड: : नरखेड परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ३० लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त
नरखेड पोलिसांनी ३१ मे रोजी गोधणी शिवार परिसरात नाकाबंदी करून अवैध रेतीची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा १० चक्का टिप्पर पकडला. या कारवाईत ३० लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि ५६ हजार रुपयांची ८ ब्रास रेती, असा एकूण ३० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहें.