रामटेक: राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासमोर मांडल्या यादव अहिर समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवतानाच्या येणाऱ्या अडचणी
Ramtek, Nagpur | Apr 27, 2026 महाराष्ट्रात यादव अहिर समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता निर्णयक टप्प्यावर येऊन पोहोचला असून या संबंधात राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांना भेटून समाज प्रतिनिधी मंडळाने विस्तार पूर्वक चर्चा केली व निवेदन दिले. रवी भवन नागपूर येथे सोमवार दिनांक सत्तावीस एप्रिल ला दुपारी त्यांना निवेदन देण्यात आले. हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.