रामटेक: अखेर..... अंबाळा जलाशयात उडी मारलेल्या युवकाचे शव तरंगताना आढळले
Ramtek, Nagpur | Apr 24, 2026 गुरुवार दिनांक 23 एप्रिल ला अंबाळा जलाशयात उडी मारून बुडालेल्या तरुणाचे शव शुक्रवार दिनांक 24 एप्रिल ला पहाटे जलाशयाच्या पाण्यावर तरंगताना आढळले. याची सूचना रामटेक पोलिसांना देण्यात आल्यानंतर सकाळी नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतकाचे नाव परीक्षित प्रभाकर सायरे वय 40 वर्ष रा. इंगोले चौक वर्धा ते असून तो गुरुवारला दारूच्या नशेत अंबाळा जलाशयच्या पश्चिमी काठावर वावरत असलेला आढळला होता.