रामटेक: भाजपा द्वारे विश्व पर्यावरण दिवसानिमित्त रामटेक शहरात वृक्षारोपण
Ramtek, Nagpur | Jun 5, 2026 शुक्रवार दिनांक पाच जूनला रामटेक शहरातील विविध ठिकाणी भाजपातर्फे विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्यात आले. माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचे प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सृष्टी सौंदर्य ग्रुप रामटेकचे पदाधिकारी, सदस्य यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण केले.