जालना: जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननातून 605 लाखांचा दंड; 209 लाख वसूल; 271 प्रकरणांत कारवाई; 99 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Jalna, Jalna | Sep 7, 2026 जालना जिल्ह्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 271 अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून 605.07 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी 209.54 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच 99 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवार दि.7 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सर्व तहसीलदारांना आदेश दिलेत.