चंद्रपुरात MD ड्रग्जवर एलसीबीचा मोठा प्रहार! 16 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन तस्कर जेरबंद
चंद्रपूर शहरात वाढत्या अमली पदार्थ तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे जटपुरा गेट परिसरात सापळा रचून पोलिसांनी मेफेड्रोन (MD) या अत्यंत घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन संशयित तस्करांना जेरबंद केले.
या कारवाईत 104.210 ग्रॅम एम.डी., दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 16 लाख 23 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमली पदार्थांविरोधातील ही कारवाई चंद्रपूर पोलिसांसाठी महत्त्वाची मानली जात असून पुढील तपास सुरू आहे.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा.
💬 तुमची प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की द्या.
🔔 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा.
#Chandrapur #MDDrugs #LCB #CrimeNews #PoliceAction #MaharashtraNews #BreakingNews
Pune City, Pune | Jun 27, 2026