पनवेल: ठेवी परत मिळण्यासाठी कर्नाळा बँक खातेदारांचा कळंबोलीत रास्ता रोको
Panvel, Raigad | Jul 2, 2026 कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे अडकलेले पैसे तातडीने परत मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी कळंबोली सर्कल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ठेवीदारांनी सहभाग घेत सरकार, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.