आर्वी: आर्वीत बळीराजा पूजन उत्साहात पार पडला; न्याय आणि लोककल्याणाच्या विचारांना उजाळा
Arvi, Wardha | Nov 11, 2026 आर्वी येथे निवृत्त अधिकारी प्रशांत एकापुरे यांच्या निवासस्थानी बळीराजा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात बळीराजांच्या न्याय, समता आणि लोककल्याणाच्या विचारांना सन्मान देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.