रामटेक: डॉ. राजीव पोतदारांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यावर रामटेक शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली सदिच्छा भेट.
Ramtek, Nagpur | Jun 1, 2026 भाजपा - सेना - राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची उमेदवारी भाजपाचे डॉ. राजीव पोतदार यांना जाहीर होताच सोमवार दिनांक एक जूनला दुपारी रामटेक येथील शिवसेना पदाधिकारी तसेच नगरपरिषद रामटेक चे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, गटनेता सुमित कोठारी, न.प. सभापती विश्वास पाटील, नगरसेवक रोशन चापले यांचे सहित अन्य पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.