जळगाव: सराफ बाजारातील रथ मार्गावर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविले; शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल
रथोत्सावात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १५ महिलांच्या गळ्यातून १ लाख ४२ हजार २५० रुपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सराफ बाजारात रथ मार्गावर घडल्या. याप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.