विक्रोळी कन्नमवार नगर मध्ये असलेल्या हुतात्मा रविंद्र म्हात्रे खेळाच्या मैदानाचे सुशोभीकरणाचा शुभारंभ शिवसेनेने केला
विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर दोन येथील असलेल्या हुतात्मा रविंद्र म्हात्रे खेळाच्या मैदानाचे सुशोभिकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आज शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख संजय मशिलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक उपेंद्र सावंत तसेच शिवसेना महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते