रामटेक: पटगोवारी व तारसा पोट निवडणुकीत शिवसेनेचा विजय; राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्या विजेत्यांना शुभेच्छा.
Ramtek, Nagpur | Apr 30, 2026 रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत पटगोवारी पोटनिवडणुकीत शिवसेनेचे संदीप सूर्यवंशी, शिल्पा भिवगडे, मनीषा मनगटे, धनराज गायकवाड हे सदस्य निवडून आले. तर तारसा येथे शिवसेनेचे सचिन कम्बाले हे सदस्य मधून निवडून आले आहेत. या सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी 30 एप्रिलला राज्यमंत्री एड.आशिष जैस्वाल यांच्या रामटेकेत येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांनी सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.