रामटेक: ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटांसह रामटेक शहरात पावसाची दमदार सुरुवात
Ramtek, Nagpur | Jun 23, 2026 मृग नक्षत्रापासून शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही पावसाची प्रतीक्षा होती. मात्र मृग नक्षत्र कोरडाच गेल्यानंतर प्रचंड उकाड्याने सामान्य नागरिक त्रासला आहे. तर शेतकरी खरीप हंगामाच्या पेरण्यासाठी पावसाची चातकासारखी वाट पाहतो आहे. अशातच मंगळवार दिनांक 23 जूनला सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान आकाशात विजेच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला व लगेचच दमदार पावसाला सुरुवात झाली.