रोहा: विनातिकीट प्रवाशांकडून 252 कोटींचा दंड वसूल
Roha, Raigad | Apr 13, 2026 मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विनातिकीट, अयोग्य किंवा अवैध तिकीटासह प्रवास करणाऱ्या 41.90 लाख प्रवाशांना पकडले. गेल्या वर्षी हा आकडा 38.05 लाख होता, म्हणजेच यात 10 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये दंड म्हणून विक्रमी 251.91 कोटी रुपये वसूल करण्यात आले, तर गेल्या वर्षी ही रक्कम 203.70 कोटी रुपये वसूल करण्यात आली होती. ही जवळपास 24 टक्के वाढ आहे.