नाशिक: देवळाली कॅम्प भागातील संसारी गाव येथे गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या
Nashik, Nashik | Nov 5, 2025 देवळाली कॅम्प भागातील संसारी गाव येथे गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक चार नोव्हेंबर रोजी घडली असून संध्याकाळी सात वाजता देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाच नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर नारायण यादव वय 32 राहणार संसारी गाव यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा भाऊ हेमंत यादव यांनी औषध उपचारासाठी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.