सेलू: सिंदी (रेल्वे) येथे पाण्याची गुळली अंगावर उडाल्याच्या कारणातून विट मारून एकास केले जखमी, दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा
Seloo, Wardha | Sep 23, 2024 पाण्याची गुळली अंगावर उडाल्याच्या कारणातून झालेल्या वादात वीट मारून एकाला जखमी केले. ही घटना तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथे ता. २० शुक्रवारी घडली. मंगलेश चव्हाण रा. सिंदी रेल्वे असे जखमीचे नाव आहे. तर सागर बाबरे व आशा बाबरे दोन्ही रा. सिंदी अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून सिंदी पोलिसांनी ता. २१ ला सकाळी १० वाजता दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अशी माहिती सिंदी पोलिसांकडून ता. २३ ला प्राप्त झाली.