अलिबाग: रेवसच्या समुद्रात बेकायदा डिझेल तस्करीवर कारवाई
Alibag, Raigad | Jul 1, 2026 अलिबाग तालुक्यांतील रेवस जेट्टी जवळील नवखार गावाच्या हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावर मांडवा सागरी पोलिसांनी सोमवारी (२९ जून) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेकायदा डिझेल तस्करीवर मोठी कारवाई केली. मासेमारी बोटींच्या माध्यमातून बेकायदेशीर आणि विनापरवाना डिझेलची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवलेल्या दोन बोटींसह सुमारे १४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.