आरोग्य यंत्रणा व लोकसहभागातून सशक्त, निरोगी महाराष्ट्र घडवूया ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ बनवूया
53.6k views | Maharashtra, India | Apr 6, 2026 राज्यातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने कार्यरत असून, या सेवा गावपातळीपर्यंत अधिक सक्षम करण्यावर विशेष भर दिला जात आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असून, या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभागाची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून सशक्त व निरोगी महाराष्ट्र घडवूया