सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित: शासनाचा ऐतिहासिक निर्णय!
1.9k views | Gondia, Maharashtra | Aug 20, 2026 सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित: शासनाचा ऐतिहासिक निर्णय! ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सर्पदंशावर वेळेत व प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ (Notifiable Disease) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाचे मुख्य फायदे: नोंदणी बंधनकारक: सर्पदंशाची प्रत्येक घटना, उपचार आणि मृत्यूची नोंद ठेवणे आता अनिवार्य असेल. ASV साठा नियोजन: सर्पविषविरोधी प्रतिविष (ASV) लसीचा तुटवडा भासू नये यासाठी पुरेसा साठा उपलब्ध करणे सोपे होईल. वेळेत उपचार: रुग्णांना तात्काळ आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होईल. 'प्रत्येक घटना नोंदवूया, वेळेत उपचार देऊया आणि अनमोल जीव वाचवूया!' – सार्वजनिक आरोग्य विभाग #SnakeBite #NotifiableDisease #PublicHealth #Gondia #HealthDepartment