रामटेक: ऑल इंडिया केमिस्ट देशव्यापी बंद आंदोलनाला रामटेकात शंभर टक्के प्रतिसाद
Ramtek, Nagpur | May 20, 2026 ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांचे वतीने बुधवार दिनांक 20 मे ला आयोजित देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन द्वारा रामटेक शहर व परिसरातील सर्व फार्मसी 100 % बंद ठेवण्यात आल्या होत्या.