नरखेड: आमदार साहेबांचा 'ऑन द स्पॉट' निकाल: सावरगाव आणि काटोल परिसरातील पांदण रस्त्यांचे प्रश्न मार्गी!
Narkhed, Nagpur | May 15, 2026 मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या शेत पांदण रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी माननीय आमदार साहेबांनी आज थेट बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सावरगाव सर्कलमधील शेबडा आणि काटोल तालुक्यातील येरला धोट येथे दोन शेतकऱ्यांमधील वादांमुळे रखडलेल्या रस्त्यांचे प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच निकाली काढण्यात आले.आमदार साहेबांनी दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून वादावर पडदा टाकला.