रामटेक: राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत मसला येथे ड्रोन द्वारे फवारणीचे यशस्वी प्रात्यक्षिक
Ramtek, Nagpur | May 16, 2026 शनिवार दिनांक 16 मे ला दुपार नंतर रामटेक तालुक्यातील मसला येथे कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाची राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता आधुनिकतेची कास धरू शकतील. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळाची व श्रमाची ही बचत होणार असल्याचे मत राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले.