वर्धा: हिंगणघाट बाजार समिती नागपूर विभागात पुन्हा अव्वल,पालकमंत्री भोयर यांनी वर्ध्यात केला सभापती अॅड. कोठारी यांचा सत्कार
Wardha, Wardha | Jun 8, 2025 स्व. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत सन 2023-24 मध्ये उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल हिंगणघाट बाजार समितीला नागपूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून बाजार समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधिरबाबू कोठारी यांचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धा विश्रामगृहात शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.