रामटेक: बस आगार रामटेक च्या सेवेत पाच राजमाता जिजाऊ बसेस; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले लोकार्पण
Ramtek, Nagpur | May 3, 2026 रामटेक बस आगारावर वाढत्या प्रवाशांचा भार बघता रामटेक बस आगाराला पाच राजमाता जिजाऊ बसेस लोकार्पित करण्यात आल्या.राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते तीन मे ला सकाळी अकरा वाजता च्या दरम्यान रामटेक बस स्टॅन्ड येथे आयोजित एका लोकार्पण सोहळ्यात हार फुलांनी सजवलेल्या बसेसची पूजा करण्यात आली. तसेच नारळ फोडून विधिवत या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.