कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूरहून बेपत्ता झालेल्या मुलाचा आढळून आला मृतदेह
रात्री आठ वाजता मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आज शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी नागपूरहून हनुमान जयंतीच्या दिवशी बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आढळून आला गिट्टीखदांच्या गवळीपुरा येथील रहिवासी असलेला आणि बेपत्ता झालेला अथर्व नानोरे याचा मृतदेह कळमेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या भरतवाडा परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास आढळून आला घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशन व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी घटनास्थळी धाव घेतली