नांदेड: २७ ऑक्टोबरला जिल्ह्यात राबवली जाणार 'राष्ट्रीय जंतनाशक मोहीम'; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचे पालकां
1.2k views | Nanded, Maharashtra | Oct 23, 2026 नांदेड जिल्ह्यामध्ये येत्या २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेतील तसेच शाळाबाह्य अशा एकूण ७ लाख ६० हजार मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयांमध्ये ही गोळी मोफत उपलब्ध करून दिली जाणार असून, पालकांनी आपल्या पाल्यांना ही गोळी चघळून खाऊ घालावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. तसेच २७ ऑक्टोबरला गोळी घेता न आल्यास ३ नोव्हेंबर रोजी विशेष मॉप-अप राऊंडद्वारे ही गोळी दिली जाणार आहे. #Nanded #नांदेड #आरोग्यमोहीम #PublicApp #LocalNews