पुणे महापालिकेचा बायोमायनिंग प्रकल्पच वादात?
देवाची उरूळी कचरा डेपो येथे जुन्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू केलेल्या बायोमायनिंग प्रकल्पात गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसतानाही ठेकेदार कंपनीने उघड्यावरच काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
महापालिका इतरांवर प्रदूषणाचे निर्बंध लादत असताना स्वतःच नियमांना फाटा देत असल्याची टीका होत आहे. प्रकल्पस्थळी शेड नाही, वजनकाटा नाही, सीसीटीव्ही नाही, तसेच देखरेखीसाठी अधिकारीही नसल्याचे चित्र आहे.
पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
#Pune #PMC #BioMining #DevachiUruli #PollutionEnvironmentMaharashtra BreakingNews CivicIssues WasteManagement UrbanIssues
Haveli, Pune | Jul 29, 2026