अमरावती: प्रेम विवाह झालेल्या जोडप्याचा वाद विकोपाला, पार्वती नगरात पत्नीने चार मजली इमारतीवरून उडी घेत संपविली जीवन यात्रा
प्रेमविवाह झालेल्या नवजोडप्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नीने थेट चार मजली इमारतीवरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना ९ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पार्वतीनगरात उघडकीस आली. आरती ऋषिकेश चौधरी (वय २७, रा. पार्वतीनगर, अमरावती) असे मृतक महिलेचे नाव आहे. पार्वतीनगरातील एका सदनिकेत राहणारा ऋषिकेश व आरती यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही पार्वतीनगरातील एका सदनिकेत राहत होते. परंतू त्यांचे काही कारणास्तव खटके उडाले आणि पती-पत्नीचा वाद सुरु झाला होता.