जालना: *जिल्ह्यातील 2 हजारशाळांमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांचे सामूहिक प्रार्थना गीत; मानवता, संवेदनशीलता आणि बांधिलकी जपली
Jalna, Jalna | Sep 7, 2026 विद्यार्थ्यांमध्ये मानवता, संवेदनशीलता, परस्पर प्रेम, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे’ हे प्रार्थना गीत नियमितपणे गायिले जात आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील २ हजार 361शाळांमधील 3 लाख 46 हजार 340 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.