जालना: धान्याच्या काळाबाजाराला लगाम; चंदनझिरा येथे मोठा साठा जप्त; कागदपत्रांशिवाय धान्याचा साठा; 157.40 क्विंटल धान्य जप्त
Jalna, Jalna | Sep 10, 2026 धान्याचा काळाबाजार आणि अवैध साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संयुक्त तपासणी मोहिमेत चंदनझिरा येथे 157.40 क्विंटल धान्य जप्त करण्यात आले. या कारवाईत अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेला तांदूळ, ज्वारी आणि वाटाणा आढळून आला. बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी दु. 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि जिल्हा पुरवठा अधिकारी शशिकांत हदगल यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली.