नागपूर शहर: धक्कादायक प्रकार! कर्जाची जप्ती टाळण्यासाठी एकाच क्रमांकावर चार ट्रक चालवणारे रॅकेट जेरबंद, लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्जाचे हफ्ते न भरल्यामुळे बँक व फायनान्स कंपन्यांकडून वाहनांची होणारी जप्ती टाळण्यासाठी एकाच गाडीचा नंबर अन्य तीन ट्रकवर टाकत चक्क चारही वाहने एकाच क्रमांकाने रस्त्यावर पळवणाऱ्या एका धक्कादायक प्रकाराचा गुन्हे शाखेच्या वाहन चोरीविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. कळमना मार्केट परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी चारही ट्रक जप्त करत दोघा जणांना अटक केली आहे.