रामटेक: पटगोवारी शेतशिवारात वीज पडून शेतकऱ्याचे कृषी साहित्य जळून खाक
Ramtek, Nagpur | Jun 29, 2026 मनसर - पटगोवारी परिसरात वादळी पावसाने कहर केल्यानंतर पटगोवारी परिसरातील शेतकरी मयूर बल्लारे याचे शेतात वीज पडल्याने शेतात ठेवलेले कृषी साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारला सायंकाळी चार वाजता च्या दरम्यान घडली. या घटनेत शेतात ठेवलेले कृषी उपकरण, पाईप, खते, बियाणे,सल्फेट सहित अन्य सामान आगीत भस्मसात झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले.