उत्तर सोलापूर: आपला नगर येथे क्रीसेंट शाळेने केलेले अतिक्रमण महापालिका अतिक्रमण विभागाने काढले;परिसरात कारवाई दरम्यान गोधंळ...
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज मंगळवारी आपला नगर परिसरात कारवाई करत क्रीसेंट शाळेने केलेले अतिक्रमण हटवले. ही कारवाई सकाळी अतिक्रमण निरीक्षक आणि पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली.कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विरोध दर्शवून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला.