नांदेड: ओम गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानांतर्गत आरोग्य शिबीर संपन्न!
81 views | Nanded, Maharashtra | Jul 31, 2026 नांदेड: शहरातील ओम गार्डन येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियाना'मध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या प्रसंगी विविध शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. नागरिकांना शासकीय योजनांचा थेट आणि सुलभ लाभ मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.