राज्य उत्पादन शुल्क जालना विभागाच्या भरारी पथकाने राणीउंचेगाव येथे धाड टाकून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गोवा निर्मित विदेशी व देशी मद्याचा मोठा साठा जप्त केला. गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत सुमारे 1 लाख 84 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विशाल आसाराम पवार रा. राणीउंचेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना याला ताब्यात घेतलं.