जळगाव पोलिसांचा ‘मिशन RISE’! युवकांच्या मदतीने उभारणार अमली पदार्थमुक्त समाज
अमली पदार्थमुक्त जळगाव घडवण्यासाठी जिल्हा पोलिसांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला बळ देण्यासाठी ‘मिशन RISE – Youth Leadership for a Drug-Free Jalgaon’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या अभियानाचा मुख्य उद्देश महाविद्यालयीन युवकांना सोबत घेऊन अमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करणे आणि सुरक्षित, व्यसनमुक्त समाज उभारणे हा आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पेनपुरे यांच्या हस्ते ‘मिशन RISE’च्या पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून ‘युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते’ निवडले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती जनजागृती, सामाजिक नेतृत्व, संवादकौशल्य आणि युवक सहभागाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
#MissionRISE #JalgaonNews #DrugFreeJalgaon #MaharashtraPolice #DrugFreeMaharashtra #YouthLeadership #JalgaonPolice #MaharashtraNews #BreakingNews #TimesOfMaharashtra