चंद्रपुरात डॉक्टरांचे आंदोलन! CCMP डॉक्टरांच्या दुहेरी नोंदणीवरून रुग्ण सुरक्षेचा सवाल
चंद्रपुरात रुग्ण सुरक्षेच्या मुद्द्यावरून डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या आहेत. CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये होत असलेली कथित दुहेरी नोंदणी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी IMA, MARD आणि इंटर्न डॉक्टरांनी संयुक्तपणे निदर्शने केली.
आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत वैद्यकीय व्यवसायातील पात्रता, प्रशिक्षण आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी केली.
कथित दुहेरी नोंदणीमुळे डॉक्टरांच्या पात्रतेबाबत आणि कार्यक्षेत्राबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो, तसेच त्याचा परिणाम थेट रुग्णांच्या सुरक्षेवर होण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या प्रकरणी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले असून, MMC मधील कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
#ChandrapurNews #IMA #MARD #MedicalCouncil #DoctorProtest #PatientSafety #MedicalEducation #MaharashtraNews #HealthNews #TimesOfMaharashtra