५० वर्षांचा संघर्ष संपणार का? स्वच्छ पाण्यासाठी पैठणच्या ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा
पैठण तालुक्यातील तुळजापूर/नवगाव येथे स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. क्रांती महिला असंघटित कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून पैठण तहसीलदारांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या भागात नागरिक मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून, तब्बल ३० वर्षांपासून स्वच्छ आणि नियमित पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. याशिवाय सांडपाण्याची विल्हेवाट, रस्ते, नाल्या आणि गटारांसह इतर मूलभूत सुविधांच्याही अडचणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाण्याच्या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
#PaithanNews #ChhatrapatiSambhajinagar #WaterProblem #GramsthaAndolan #DrinkingWaterIssue #MaharashtraNews #VillageIssue #BreakingNews #TimesOfMaharashtra