रामटेक: रामटेक शहरात संत गोरोबा काका पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
Ramtek, Nagpur | Apr 15, 2026 कुंभार समाजाचे पूज्यनीय संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी कुंभारपुरा शनिवारी वार्ड रामटेक येथे मंगळवार दिनांक 14 एप्रिल तसेच बुधवार दिनांक 15 एप्रिल ला सायंकाळी सात वाजता पासून भक्ती भावाने साजरी करण्यात आली. बुधवार ला रात्री पुण्यतिथी कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. संत गोरोबा काका कुंभार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रामटेक यांच्या विद्यमाने संत गोरोबाकाका कुंभार समाज मित्रपरिवार द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.