जालना तालुक्यातील तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलापांगरी येथील दुधना नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला. कारवाईदरम्यान एक ट्रॅक्टर वाळू भरताना आढळून आला; मात्र चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन टॅक्टर जप्त केलाय.