रोहा: कोलाड पोलिसांची तत्पर कामगिरी
Roha, Raigad | Apr 16, 2026 कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौळवाडी येथील एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोध लावून तिला सुरक्षितपणे कुटुंबियांच्या ताब्यात दिले. या कामगिरीबद्दल कोलाड परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. मोबाईल वापरण्याच्या कारणावरून आईने रागावल्यानंतर संबंधित मुलगी रात्रीच्या वेळी घरातून निघून गेली होती. याबाबत तिच्या आईने कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी तत्काळ हालचाली सुरू करत शोध पथकाची नियुक्ती केली.