धुळे: नगरपट्टी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते
Dhule, Dhule | Sep 4, 2024 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मंगळवारी रोजी धुळ्यातील गांधी पुतळा नगरपट्टी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले. अमित ठाकरे यांच्या आगमनास फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकार्यांची मोठी उपस्थिती होती.