धुळे: पारोळा रोड परिसरात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली: मयत व्यक्ती अजय राजू बावीसकर
Dhule, Dhule | Sep 3, 2024 आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एग्रीकल्चर कॉलेज पारोळा रोड परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास एका गटारीत अनोळखी व्यक्तीच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटली असून सदर मयत व्यक्ती अजय राजू बाविस्कर वय 27 असे मयताचे नाव आहे. अजय राजू बाविस्कर हे मुळ मोडाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील रहिवाशी असून त्यांचे वडील राजू देवचंद बाविस्कर यांनी त्याची ओळख पटवलेली आहे. मयताच्या हातावर जय भिम, सूर्याची प्रतिमा आणि अजय नाव देखील गोंदलेले होते.