धुळे: धुळ्यात 22 माजी नगरसेवकासह बडा नेताही अजित पवार गट राष्ट्रवादीच्या संपर्कात, युवक प्रदेशउपाध्यक्ष भावसार यांची माहिती
Dhule, Dhule | Sep 3, 2024 धुळ्यातील विविध राजकीय पक्षांचे २२ माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असून लवकरच ते पक्षात प्रवेश करतील. त्याबरोबरच विधानसभा निवडणूकीपूर्वी बड़ा धमाका होईल. धुळ्याची धुरा सांभाळणारा एक सक्षम नेता राष्ट्रवादीत प्रवेश करेल, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना केला.