रामटेक: नेपाळ येथे आयोजित एशियन थायबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रामटेकचे 12 खेळाडू रवाना
Ramtek, Nagpur | May 5, 2026 नेपाळ येथील पोखरा येथे आयोजित एशियन थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रामटेक च्या बारा थाय बॉक्सिंग खेळाडूंची निवड झाली आहे. सात मे पासून नेपाळ येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत हे खेळाडू विविध वजन गटात देशाचे प्रतिनिधित्व करतील. दिनांक पाच मे ला या खेळाडूंचा गांधी चौक, रामटेक येथे सत्कार करण्यात आला.