अमरावती: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी धडकले मजीप्रा कार्यालयावर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अनागोंदी कारभारामुळे जनसामान्य नागरिक त्रस्त आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात अवैधन नळ कनेक्शन असतानाही मजीप्रा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे आणि जनसामान्यांना अव्वाच्या सव्वा पाणी बिल देत आहे. त्यामुळे याविरुद्ध आक्रमक झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यासाठी शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर धडकले होते. शिवसेनेचे शहर प्रमुख आशिष ठाकरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.