सेलू: शहरात भरधाव वाहने चालविणाऱ्या आणि यशवंत चौकात टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी शहर काँग्रेसचे ठाणेदारांना निवेदन
Seloo, Wardha | Oct 16, 2024 शहरातील प्रमुख रस्त्यांनी भरधाव दुचाकी वाहने चालविणाऱ्या आणि यशवंत व बसस्थानक चौकात शाळकरी मुलींना पाहून टवाळगिरी करणाऱ्या रोडरोमियोवर कारवाई करावी. अशी मागणी सेलू शहर काँग्रेसच्या वतीने आज ता. १६ बुधवारला दुपारी १ वाजता पोलीस निरीक्षक देवेन्द्र ठाकूर यांचेकडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक बिसेन यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन केली.